Breaking-newsपिंपरी / चिंचवड
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात स्वीय सहायक पदी निलांबरी भिंगारदिवे यांची नियुक्ती

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील स्वीय सहाय्यक नीलांबरी भिंगारदिवे यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. तर, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्वीय सहाय्यक रागिणी पुजारी यांची नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात बदली करण्यात आली आहे.
स्वीय सहाय्यक भिंगारदिवे आणि पुजारी याच्या बदलीचे आदेश सोमवारी (दि. १०) काढण्यात आले. दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप विष्णोई यांची देखील बदली होणार असल्याची चर्चा होती. मात्र, पोलीस सूत्रांकडून माहिती घेतली असता आयुक्त विष्णोई यांची बदली होणार नसून ती केवळ चर्चा होती, अशी माहिती देण्यात आली.





