breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
#Covid 19 : पिंपरी-चिंचवड कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित, शहराच्या सीमा केल्या बंद
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहराच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांनी (अंतर्गत प्रवास) दिलेले पास २२ तारखेपर्यंतच ग्राह्य धरले जाणार आहे. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या दुकनांचा कालावधीही कमी करण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. आज रात्री बारा पासून २७ तारखेपर्यंत शहर सील करण्यात आले आहे.