breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव लांबणीवर

पिंपरी |महाईन्यूज|

जागतिक संसर्ग कोरोना (कोविड -१९) च्या पार्श्वभूमीवर १० एप्रिल २०२० रोजी होणारा पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव स्थगित करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. अशी माहिती फेस्टिवलचे डायरेक्टर रमेश होलबोले यांनी दिली.

यंदाच्या वर्षी महोत्सवामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्व मिळून ४०० लघु चित्रपट सहभागी झाले होते. या महोत्सवासाठी आंतरराष्ट्रीय परीक्षक लाभले होते, परंतु, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणीबाणीमुळे आंतरराष्ट्रीय परीक्षक, या महोत्सवास उपस्थित राहू शकत नाहीत. तसेच, भारताच्या विविध राज्यातील कानाकोपऱ्यातून सिनेदिग्दर्शकांनी आपला सहभाग नोंदविलेला आहे. या वर्षीच्या महोत्सवाचे वैशिट्य म्हणजे पिंपरी चिंचवडवासीयांना ” पिंपरी चिंचवड शोकेस” या अंतर्गत स्थानिक कलाकारांचे उत्कृष्ट लघु चित्रपट पहावयास मिळणार आहेत.

परंतु शासनाने काढलेल्या परीपत्रकानुसार कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून सर्वच सांस्कृतिक व शासकीय कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे. त्याला अनुसरूनच काल झालेल्या पी.सी.एम.सी. फिल्म क्लबच्या मिटिंगमध्ये हा महोत्सव पुढे ढकलण्याचे ठरवले आहे.

या वेळी फेस्टिव्हलचे डायरेक्टर रमेश होलबोले, पी.सी.एम.सी. फिल्म क्लबचे संचालक अविनाश कांबीकर, दत्ता गुंड, फेस्टिव्हलचे क्रिएटिव्ह डायरेक्टर हर्षवर्धन धुतुरे, फेस्टिव्हलचे प्रमुख मार्गदर्शक सांस्कृतिक सल्लागार प्रवीण तुपे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button