breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये 15 हजार नागरिकांनी बुडविला मिळकतकर

महापालिकेच्या करसंकलन विभागाला थकबाकी वसुलीत न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा अडथळा होत आहे. 5 लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या 2 हजार 700 जणांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्यातील काही थकबाकींदाराकडे एक-दोन कोटींहून अधिक थकबाकी वसुली आहे. त्यात रुग्णालये, शैक्षणिक संस्था, कंपन्या, बड्या व्यक्तींकडून मिळकत कराबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. हे दावे निकाली निघत नसल्याने ही थकबाकी वसूल करण्यास अडचण होत आहे. या प्रकरणाकडे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी लक्ष घातले आहे. घरपट्टी, पाणीपट्टी यासह अन्य थकबाकीदारांना नोटीस देत शनिवार (दि.13) लोकअदालतीचे आकुर्डी न्यायालयात आयोजन केले आहे.

नोंदणीबाबत विद्यमान सहायक आयुक्त अनभिज्ञ?
महापालिकेचे शहरात 16 कर संकलन केंद्रे आहेत. तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी सन 2013 मध्ये महापालिकेच्या हद्दीतील मालमत्तेचे सर्व्हेक्षण केले होते. त्या सर्व्हेक्षणात आढळलेल्या 82 हजार 181 मिळकतींपैकी 14 हजार 169 मिळकतींना अद्यापही कर आकारणी केलेली नाही. तसेच काही मालमत्तेचे जागा मालक आढळून येत नसल्याने त्या मिळकतीच्या नोंदी अद्याप बाकी आहेत. त्या मालमत्तेचा नोंदणीबाबत विद्यमान सहायक आयुक्त प्रवीण आष्टीकर अनभिज्ञ आहेत. तसेच त्या-त्या प्रभागातील नगरसेवकांचा पालिका कर्मचाऱ्यांना अडथळा येवू लागला आहे. नगरसेवकांनी मिळकतींची नोंद करताना कर्मचाऱ्यांना बांधकामाच्या नोंदी कागदोपत्री कमी दाखविण्याच्या सूचना पालिकेच्या कर्मचाऱ्यांना केल्या जात आहेत. त्यामुळे महापालिकेला नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button