breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये 113 रुग्ण कोविड पाॅझिटिव्ह

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड शहरात आज (सोमवारी) कोविड पाॅझिटिव्ह 113 रुग्ण आणि महापालिका हद्दीबाहेरील 8 असे एकूण 121 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आजपर्यंत रुग्णसंख्या 87 हजार 996 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 3 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात वल्लभनगर येथील 75 वर्षीय वृद्ध, खेड येथील 68 वर्षीय पुरुष आणि 65 वर्षीय महिला रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 87 हजार 996 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 84 हजार 710 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1529 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 634 अशा 2163 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 849 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1623 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button