breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये ‘सर्वांसाठी घरे’ प्रकल्पांचा प्रस्ताव महासभेने ठेवला तहकूब

या प्रकल्पांसाठी लाभार्थी हिस्सा आणि सोडत प्रक्रिया निश्चितीचा प्रस्ताव, च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडीत होणार प्रकल्प

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेंतून सर्वांसाठी घरे हा प्रकल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिका राबवित आहे. या प्रकल्पांसाठी लाभार्थी हिस्सा व सोडत प्रक्रिया निश्चित करण्यात येणार आहे. मात्र, नगरसेवकांना पंतप्रधान आवास योजनेची सविस्तर माहिती देण्यात यावी, त्या प्रकल्पातील काही त्रूटी दूर कराव्यात, तोपर्यंत हा प्रस्ताव तहकूब ठेवावा, अशी मागणी नगरसदस्यांनी केली. त्यानंतर महासभेपुढे नियम क्रमांक एकनूसार दाखल केलेला हा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान, या प्रकल्पांत 3 हजार 664 सदनिकांसाठी लाभार्थी, त्यांचा हिस्सा व सोडत प्रक्रिया सोडत निश्चित करण्यात येणार होती.

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरीब निर्मुलन मंत्रालयाने निर्गमित केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शन सुचनांचा अवलंब करुन ठिकठिकाणी आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर प्रधानमंत्री आवास योजना राबविणेत येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सध्यस्थितीत च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी याठिकाणी घरे बांधणे प्रकल्प चालू केला आहे.

सदरील प्रकल्पांत केंद्र व राज्य शासनाकडून अडीच लाख रुपये अनुदान देणार आहे. तर उर्वरीत रक्कम हा लाभार्थी हिस्सा राहणार आहे. तो तीन टप्प्यात 40-40 आणि 20 टक्के असा राहणार आहे. या प्रकल्पाचे आर्थिकदृष्ट्या अतिकार्यक्षम व अतिव्यवहार्य वसुलीच्या पर्यायापैकी लाभार्थींकडून घरकूलच्या किंमतीपोटी वसुल करावयाचे हिश्श्यांचे रक्कम वरीलप्रमाणे राहणार आहे.

या प्रकल्पांत मुलभूत सुविधा कामे, भाववाढ फरक अदायगी ही महापालिकेची आहे. पालिकेचा आर्थिक सहभाग म्हणून सदर प्रकल्प मनपा जागांवर करणे, प्रकल्पांतील सुविधा पुरविणेचा खर्च, विकास शुल्क माफी व भाववाढ खर्च, अस्थापना खर्च स्वरुपात आहे. या प्रकल्पात एकूण 3 हजार 664 सदनिकांसाठी लाभार्थी, त्यांचा हिस्सा व सोडत प्रक्रिया निश्चित करणे आवश्यक आहे. मात्र, हा प्रस्ताव महासभेने तहकूब ठेवला आहे.

घरांसाठी ही आहे नियमावली…

सदरील प्रक्रियेचा 30 दिवसाच्या कालावधीत इच्छुक लाभार्थ्यांनी मनपाने दिलेल्या लिंकद्वारे आवश्यक फाॅर्म आॅनलाईन भरुन, सदरची फाॅर्मची प्रिंट काढून तो नागरी सुविधा केंद्राकडे प्रस्तृत करावा.

नव्याने फाॅर्म भरणारे – ज्या लाभार्थ्यांनी यापुर्वीच्या सर्वेक्षणात भाग घेतला नव्हता. त्यांनी स्वतःचा फाॅर्म व कागदपत्रे (आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, वोटर कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, बॅंक पास बुक, वीजबिल, प्रति प्रकल्पासाठी 5 हजारांचा डीडी, 2 पासपोर्ट फोटो) तपासणीसाठी पात्रता पडताळणी नागरी सुविधा केंद्राकडून करुन घेणे आवश्यक राहील, त्याच ठिकाणी सदर फाॅर्म व कागदपत्रे, डीडी जमा केल्यानंतर पोहोच पावती मिळेल.

यापुर्वी फाॅर्म भरलेले – ज्या लाभार्थ्यांनी यापुर्वी सर्वेक्षणात भाग घेवून अर्ज सादर केला होता. त्यांनी फक्त आॅनलाईन फाॅर्म भरणे, सोबत 5 हजार डीडी जमा करणे, त्यानंतर पोहोच पावती देणेत येईल. तसेच मधील कालावधीत नियमानूसार उत्पन्नापेक्षा वाढ, अथवा स्वतःचे मालकीचे घर घेतल्यामुळे यापुर्वी फाॅर्म भरलेल्यांपैकी सदरील इच्छुक लाभार्थी सोडतीत भाग घेण्यास अपात्र ठरतील.

सर्व अर्जांची नागरी सुविधा केंद्राकडून पडताळणी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी आॅनलाईन वेबसाईटवर प्रसिध्द केली जाईल. लाॅटरी पध्दतीने सोडत काढून प्रत्येक प्रकल्पाकरीता लाभार्थी निश्चित करण्यात येतील. इच्छुकांना तीन प्रकल्पांमध्ये विकल्प भरणेस मुभा असणार आहे. सदनिका न मिळाल्यास लाभार्थ्यांना सदरील रक्कम परत करण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button