breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे जोरदार शक्तीप्रदर्शन; दुचाकी रॅलीद्वारे पार्थ पवार, अजित पवारांचा जनसंवाद

पिंपरी: मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्र पक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी दुचाकी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. त्याद्वारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उमेदवार पार्थ पवार यांनी सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला.

निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज अणि संत तुकाराम महाराज यांच्या शिल्पाला अभिवादन करुन दुचाकी रॅली सुरू करण्यात आली. या रॅलीमध्ये महाआघाडीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते-पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

भक्ती-शक्ती चौकातून निगडी प्राधिकरण, आकुर्डी गावठाण, खंडोबा माळ, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, मोरवाडी, पिंपरीगाव, संत तुकारामनगर, वायसीएम, कासारवाडी, दोपोडीमार्गे नगरसेवक रोहीत काटे यांच्या निवासस्थानी रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button