पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची जोरदार हजेरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/rain-mumbai10.jpg)
बऱ्याच दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दसऱ्याच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार हजेरी लावली आहे.आज सायंकाळी अचानक ढग दाटून आले आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला.अगोदर हलक्या सरी कोसळल्यानंतर अचानकच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला.यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाऊसाने दडी मारली होती.आज दसरा असल्याने सर्वच नागरिक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत.परंतु सायंकाळ पासून कोसळणारा पाऊस पाहून या सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे. शहराच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला आहे. तर विजांच्या कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यामुळे विजेचा (लाईट)चा लपंडाव सुरू आहे.काही भागात बत्ती देखील गुल झाली आहे. सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून शहरात पाऊस सुरू आहे. दिवसभर उष्णता वाढली होती मात्र पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. साची हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.