breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये नाईट कर्फ्यु लागू; महापालिकेकडून खबरदारी

पिंपरी |महाईन्यूज|

शहरांमध्ये रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत नाईट कर्फ्यु (संचारबंदी) लागू केली आहे. ही संचारबंदी जानेवारीपर्यंत असेल. नवीन कोरोना विषाणूचा शहरात प्रसार होवू नये यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

नवीन उत्परिवर्तन करणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परदेशी प्रवाशांवर उपचार करण्यासाठी भोसरीतील महापालिकेचे स्वतंत्र रुग्णालय सज्ज करण्यात आले आहे. तसेच वाकड येथील दोन हॉटेलही प्रवाशांच्या कॉरंटाईनसाठी सज्ज ठेवली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिली.

ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये, यासाठी महापालिकेने दक्षता घेण्यात येणार आहे. लंडनवरून येणाºया प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. वाकडमधील जिंजर, सयाजी हॉटेलमध्ये स्व:खर्चाने त्यांना सात दिवसांसाठी विलगीकरणात रहावे लागणार आहे. यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबत आदेश जारी केले आहे. हवाई प्रवाशांना शोधण्यासाठी कार्यकारी अभियंता सतिश इंगळे यांची नियुक्ती केली आहे. नवीन विषाणूच्या पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी भोसरीत नवीन रुग्णालय सज्ज ठेवले आहे.

परदेशातून येणाऱ्या हवाई प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. वाकडमधील जिंजर, सयाजी हॉटेलमध्ये स्व:खर्चानेसात दिवसांसाठी विलगीकरणात रहावे लागणार आहे. प्रवासी येताना लक्षणे आढळून आल्यास त्यास पुढील उपचारासाठी थेट भोसरीतील रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. जुन्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये नवीन विषाणूच्या रुग्णांना ठेवले जाणार नाही.
अजित पवार, अतिरिक्त आयुक्त

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button