पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 169 जणांना कोरोनाची बाधा, दोनजणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pcmc-Corona-virus.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आज दिवसभरात 169 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. तर, कोरोनाने दोनजणांचा मृत्यू झाला. आजअखेर पिंपरी-चिंचवडमध्ये 94 हजार 437 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी दिसत असले तरी अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून खबरदारी आणि उपाययोजना केली जाते. दैनंदिन संशयीत व्यक्तींची तपासणी केली जाते. बाधित व्यक्तींना उपचारासाठी पाठविले जाते. सर्वांना सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. आज दिवसभरात 929 घरांना भेटी देऊन 3 हजार 133 व्यक्तींची तपासणी केली. त्यापैकी 169 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. आज घडीला शहरामध्ये 94 हजार 437 जणांना कोरोना झाला. त्यापैकी 91 हजार 144 व्यक्ती कोरोनातून मुक्त झाले. त्यांना आता कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत.
आज दिवसभरात विलगीकरण कक्षामध्ये 2 हजार 705 संशयीत दाखल झाले. त्यापैकी 2 हजार 470 जणांचे चाचणी अहवाल निगिटिव्ह आले. 1 हजार 130 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. रुग्णालयात 824 जण दाखल आहेत. 2 हजार 649 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. आज 112 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर, दोनजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्राप्त झाली आहे.