breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत काल शुक्रवारी (दि. 21) 164 कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद करण्यात आली. आठजणांना आपले प्राण गमवावे लागले. दोन दिवसांत कोरोना बाधितांच्या संख्येत हळुवारपणे वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरातील पाच आणि पालिका हद्दीबाहेरील तीन अशा आठ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये पिंपरीतील 67 वर्षीय पुरुष, कासारवाडीतील 57 वर्षीय पुरुष, वाकडमधील 45 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 50 वर्षीय पुरुष, भोसरीतील 75 वर्षीय वृद्ध महिला, आंबेगाव येथील 60 वर्षीय पुरुष, राजगुरुनगर येथील 70 वर्षीय पुरुष, खेड मधील 75 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 90 हजार 289 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 86 हजार 998 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1 हजार 582 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 655 अशा 2 हजार 237 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या 631 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 927 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button