पिंपरी चिंचवडमधून उत्कृष्ट खेळाडू निर्माण करा – सभापती तुषार हिंगे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/WhatsApp-Image-2019-07-11-at-6.03.18-PM.jpeg)
- जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन बैठक
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहर कष्टक-यांची नगरी आहे. या उद्योगनगरीतून आपल्याला चांगले खेळाडू तयार करायचे आहेत. याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये सहभागी करुन त्यांना चांगल्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण द्यावे, जेणेकरुन खेळात स्पर्धा वाढून शहरातून उत्कृष्ट खेळाडू तयार होतील, असे मत क्रीडा सभापती तुषार हिंगे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2019-20 च्या आयोजन संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीस नगरसेवक निलेश बारणे, अ प्रभाग अध्यक्षा
शर्मिला बाबर, नगरसेवक अभिषेक बारणे, सहायक आयुक्त आशा राऊत, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, तालुका क्रीडा अधिकारी हरनाळे सर, बागुल सर, रज्जाक पानसरे, मनपा, खाजगी शाळेतील सर्व क्रीडा शिक्षक व पालक उपस्थित होते.
हिंगे म्हणाले की, या स्पर्धेच्या माध्यमातून जेवढे स्पर्धक सहभागी होतील. त्या प्रत्येक खेळातून उत्कृष्ट अशा खेळाडूंची निवड होईल. एखादा चांगला संघ निवडला जाईल. त्या विद्यार्थ्यांना State व National स्तरावरील स्पर्धेसाठी आपल्या वतीने चांगल्या प्रशिक्षकांची नेमणूक करुन त्यांना त्या दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल.
तसेच भविष्यात ह्या निवडलेल्या संघाची सामने बालेवाडी, क्रीडा संकुल येथे घेण्याचा आमचा मानस आहे. जेणेकरुन पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडुंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाबद्दल तेथील सोई-सुविधासह माहिती मिळावी. त्यांच्या पुढील स्पर्धेसाठी उत्साह अधिक व्दिगुणित व्हायला हवा. त्यामुळे प्रत्येक शिक्षक, प्रशिक्षक, व पालक यांनी आपल्या पाल्याला फक्त अभ्यासात किंवा शिक्षण याकडे जास्त कल न देता येणा-या काळात खेळाकडेही करियर म्हणून पाहावे, असे ते म्हणाले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आगामी काळामध्ये अशा प्रकारचे स्पर्धेचे नियोजन करण्यात यावे, याकरिता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. काहीतरी नवीन अशी संकल्पना क्रीडा विभागातून राबविली गेली पाहिजे. जेणेकरुण शहरातील तब्बल एक ते दिड लाख विद्यार्थांना याचा फायदा होऊ शकतो.मी विनंती करतो.
या स्पर्धेमध्ये एकुण १६ खेळांचा समावेश असणार आहे. क्रीडा विभाग व शिक्षण विभाग यांच्यात समन्वय साधून या स्पर्धा येणा-या
काळात यशस्वी कराव्यात, अशा सुचना यावेळी देण्यात आल्या आहे.