breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्ट्यांचा सर्वे युद्धपातळीवर करावा, अन्यथा आंदोलन

  • मनसेचे गटनेते सचिन चिखले यांची मागणी
  • आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले निवेदन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्यासाठी झोपडपट्ट्यांचा सर्वे करण्यात दिरंगाई होत आहे. हा सर्वे व्यवस्थित करण्यात यावा, अन्यथा झोपडपट्टी धारकांना सोबत घेऊन महापालिकेवर आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष तथा पालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी दिला आहे.

यासंदर्भात चिखले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन व्हावे, त्यांना हक्काचे घर मिळावे. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील सुमारे 71 झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम 2017 साली ‘कँनबेरी’ कंपनीला दिले आहे. परंतु, दोन वर्ष होत आले तरीदेखील आजतागायत केवळ 55 झोपडपट्ट्यांचा सर्वे करण्यात आला आहे.

या कामात दिरंगाई होत असून सर्वे व्यवस्थितरित्या होत नसल्याचा आरोप निगडी सेक्टर 22 मधील नागरिकांमधून होत आहे. यामध्ये वैयक्तिक लक्ष देऊन शहरातील संपूर्ण झोपडपट्ट्यांचा सर्वे युद्धपातळीवर पूर्ण करावा. सर्वेचे काम वेळेत नाही पूर्ण केले तर शहरातील सर्व झोपडपट्टी धारकांना सोबत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करेल, अशा इशारा चिखले यांनी दिला आहे.

या मागणीला सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, आरपीआय वाहतूक आघाडी प्रदेश अध्यक्ष अजीज शेख, समाजवादी पार्टी अध्यक्ष रफीक खुरेशी, अखिल भारतीय गरिबी निर्मुलन समिती अध्यक्ष लालासाहेब गायकवाड, संजय वाघमारे, सुधीर कांबळे आदींनी देखील समर्थन केले आहे. निवेदनावर त्यांच्या स्वाक्षरी आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button