breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात कोरोना लसीकरणासाठी “ड्राय रन”चे आयोजन

पिंपरी |महाईन्यूज|

कोरोना महामारीत योध्दा म्हणून काम करणा-या डाॅक्टरासह अन्य वैद्यकीय कर्मचा-यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, शासनाच्या निर्देशानूसार कोरोना लसीकरणासाठी त्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात उद्या (शनिवारी) कोरोना लसीकरण ‘ड्राय रन’चे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोना महामारीच्या नियंत्रणासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारने केलेल्या सुचनांनुसार कोरोना लसीकरणाचे नियोजन करण्यात येत आहे. कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर उद्या दि. ०२ जानेवारी २०२१ रोजी होत आहे. त्यासाठी महाराष्ट्रामधील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्हयांची निवड करण्यात आलेली आहे.

पुणे जिल्हयामधून निवडलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयात देखील लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयामध्ये Conducting dry run for Covid-19 Vaccination अंतर्गत मॉक ड्रील (प्रात्यक्षिक) चे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत ड्राय रन नियोजनाची पाहणी आज (शुक्रवारी) आयुक्त श्रावण हर्डीकर, अति. आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. संगीता तिरूमणी, डॉ. बाळासाहेब होडगर व महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी केली.

सदर लसीकरणाच्या ड्राय रन मध्ये निवडण्यात आलेल्या, विविध ठिकाणच्या २५ जणांना लसीकरणासाठी निवडण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही. त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा या सोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष तयार केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button