breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधल्या 50 डॉक्टर्सना कोविड योध्यांचा सन्मान

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

संपूर्ण देशात गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना विरोधात एक प्रकारचे युध्द सुरू आहे. या युध्दात डॉक्टर्स दिवसरात्र लढा देत आहेत. स्वतःची व आपल्या कुटुंबीयांची पर्वा न करता या रोगाची लागण झालेल्या रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करत आहेत, या लढ्यात बऱ्याच डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाली आहे, ते बरे होऊन पुन्हा आपले कर्तव्य पार पाडत आहेत, काहींनी तर यात आपले प्राण देखील गमावले आहेत. रुग्णांची आहोरात्र सेवा करणा-या 50 डॉक्टर्सना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना व धन्वंतरी क्रिसॅलिस हॉस्पिटलच्या कोविड योध्यांचा सन्मान देण्यात आला आहे.

१५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राजेश्वर जंजाळे (एस.पी. कस्टम) यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरातील डॉ. अजित पाटील, डॉ. सारिका भोईर, डॉ. पदमनाभ केसकर यांच्यासह एकूण ५० डॉक्टर्स कोविड योध्यांचा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी निमाचे अध्यक्ष डॉ. सत्यजित पाटील यांनी सर्व डॉक्टरांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सर्व प्रथम आंतरराष्ट्रीय
मानवाधिकार संघाचे आभार मानले, तसेच त्यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर रुग्णांना बरे करण्यासाठी आपले सर्वतोपरी प्रयत्न करतात, त्यातूनही जर रुग्ण दगावला तर त्यांच्यावर प्राण घातक हल्ले होतात, अशी खंत देखील व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या वतीने डॉक्टर्स सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. महेश शेटे यांनी डॉक्टरांना यापुढे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ नेहमी आपल्या बरोबर राहील, आणि डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी यशस्वी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले.

यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविराज साबळे, प्रदेश उपाध्यक्ष शरद शेट्टी, डॉक्टर्स सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. महेश शेटे, प्रदेश सदस्य विशाल डांगे, तुषार कापरे, डॉ. वैदेही जंजाळे, धन्वंतरी क्रिसॅलिस हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. सलील पाटील, डॉ. श्वेता पाटील, सचिन पाटील, सचिन सुतार, विकास दंडवते आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रिसॅलिस हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. सलील पाटील, डॉ. श्वेता पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button