Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर पदासाठी 6 नोव्हेंबरला निवडणूक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/pcmc-4.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदाची निवडणूक 6 नोव्हेंबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची मुदत 2 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते पाचपर्यंत राहणार आहे, अशी माहिती महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.
उपमहापौर तुषार हिंगे यांचा दहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बुधवारी (दि.14) महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. आता उपमहापौरपद या रिक्त पदासाठी 6 नोव्हेंबर 2020 रोजी निवडणूक होणार आहे.
महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी अकरा वाजता विशेष सभेत ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.