Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी चिंचवडचे माजी महापौर रंगनाथ फुगे यांचे निधन
पिंपरी|प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रंगनाथ फुगे यांचे आज (दि.१८) निधन झाले आहे. त्यांचे वय ८० होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन विवाहित मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
फुगेवाडी प्रभागातून रंगनाथ फुगे काँग्रेसच्या चिन्हावर पिंपरी चिंचवड महापालिकेत निवडून आले होते. तीनवेळा त्यांनी फुगेवाडीचे प्रतिनिधित्व केले. १९९६ ते १९९७ दरम्यान त्यांनी शहराचे महापौरपद देखील भूषविले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. शेवटपर्यंत ते सक्रिय होते.
फुगे यांची चार दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.