पिंपरी-चिंचवडचे महापौर जाणार ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Rahul-Jadhav-784x441.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवडचे महापौर राहूल जाधव ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर जाणार आहेत. 7 ते 10 जुलै दरम्यान आयोजित अशिया पॅसिफिक शहराच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला ते हजेरी लावणार आहेत. त्यासाठी येणा-या 4 लाख 80 हजार रुपयांच्या खर्चाचा स्थायीने काल बुधवारी (दि. 12) मंजुरी दिली.
या परिषदेमध्ये जागतिक दर्जाचे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. ध्येनिष्ठ व्यवसाय आखून शहरे गतीमान बनविणे, शहरांची स्थिरता, गतीशीलता, नवनिर्माण करण्याची क्षमता यावर उहापोह होणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहराला याचा फायदा होणार आहे. त्यासाठी या परिषदेत सहभागी होणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेन येथे आयोजित या आंतरराष्ट्रीय परिषदेत 100 शहरांचे सुमारे एक हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
महापौरांच्या दौ-यावर 4 लाख 80 हजार रुपयांचा खर्च होणार आहे. निगडीतील मेसर्स व्हिजन हॉलिडेज या ठेकेदार संस्थेकडून दौ-याचे नियोजन केले जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी मान्यता दिली.