breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘पिंपरी-चिंचवडकरांनो करा एकच निर्धार, कोरोना हद्दपार’ – आयुक्त श्रावण हर्डीकर

पिंपरी | महाईन्यूज

कोरोनाच्या संसर्गामुळे बाधित होणा-या रुग्णसंख्येत घट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र कोरोनाच्या समुळ उच्चाटनाची लढाई अजुन आपण पुर्णपणे जिंकलेली नसुन आगामी काळात एकजुटीने प्रयत्न करुन कोरोनाला कायमचे हद्दपार करण्याचा संकल्प करुया, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. तसेच, पिंपरी-चिंचवडचा निर्धार-कोरोना हद्दपार मोहिमे अंतर्गत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उपस्थितांना ‘आमचा निर्धार – कोरोना हद्दपार’ या संकल्पाची शपथ दिली. पिंपरी-चिंचवडकरांनाही निर्धार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत आज ‘पिंपरी चिंचवडकरांचा निर्धार – करुया कोरोना हद्दपार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे, संदिप खोत, स्मिता झगडे, आशादेवी दुरगुडे, सामाजिक कृती दलाचे डॉ.सुभाष साळुंखे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. प्रारंभी पिंपरी चिंचवड शहराच्या जडण घडणीचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांच्या प्रतिमेस महापौर ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महापौर ढोरे म्हणाल्या, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासुन सर्वजण झटत आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातुन जनजागृती आणि सर्व्हेक्षणाचे काम चांगल्या पध्दतीने सुरु आहे. मात्र अजुन कोरोना पुर्णत: हद्दपार झाला नाही. नागरिकांनी मास्कचा वापर, शारिरीक अंतर, सॅनिटायझरचा वापर करणे आदी सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. आता दसरा सण येत आहे यात महिलांचा सहभाग जास्त असतो. कोरोना आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी आपण साधेपणाने सण साजरे करावेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि गर्दी करणे टाळणे आवश्यक आहे. कोरोना मुक्त शहर करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे असे आवाहन यावेळी महापौर ढोरे यांनी केले.

पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्व्हेक्षणाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी कोणीही कोरोना पुर्णपणे गेला असा समज करुन घेवु नये. या आजाराच्या संक्रमणाचा धोका अद्यापही कायम आहे त्यामुळे गाफिल न राहता आपण कोरोना विरुध्द लढा द्यायचा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका राज्यातील सर्वात चांगले काम निश्चित करेल. लोक सहभागातुन कोरोना मुक्तीची मोहिम आपण यशस्वीपणे पार पाडू असा विश्वास ढाके यांनी यावेळी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवडचा निर्धार – कोरोना हद्दपार मोहिमे अंतर्गत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उपस्थितांना ‘आमचा निर्धार – कोरोना हद्दपार’ या संकल्पाची शपथ दिली. सहा महिने अतिपरिश्रम करुनही कोरोना आजार आपल्या शहरातुन गेलेला नाही. आम्हीपिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्व सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी निर्धार करतो की, आम्ही मास्कचा वापर नेहमी व यथायोग्य पध्दतीने करणार. एकमेकांपासुन शारिरीक अंतर आणि मानसिक जवळीक राखणार. गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि गर्दी करणे टाळणार. कोरोना आजारा बद्दल इतरांना प्रेमाने समजुन सांगणार. अशी शपथ आज घेण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button