breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीत शिवसेनेचा दारुण पराभव, राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे 19 हजार 618 मतांनी विजयी

खासदार श्रीरंग बारणेंचा विजयाचा दावा फोल ठरला, मागील पराभवाचा काढला वचपा

पिंपरी महाईन्यूज – मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरीतून केलेला विजयाचा दावा फोल ठरला आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांचा 19 हजार 618 मतांनी विजय मिळविला आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांना पराभवाची धूळ चारली असून मागील पराभवाचा वचपा काढला आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी होती. या दोघांसह एकूण 18 उमेदवार रिंगणात होते. पिंपरीत 50.17 टक्के मतदान झाले आहे. 1 लाख 77 हजार 387 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे.

बालेवाडीतील मतमोजणी केंद्रावर सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीद्वारे पिंपरीच्या मोजणीला सुरुवात झाली. 499 टपाली मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएममवरील मतांची मोजणी सुरु झाली. या मतदार संघात 399 केंद्र आहेत. प्रत्येक टेबलवर 20 केंद्र याप्रमाणे 20 टेबलांवर मतमोजणी झाली. मतमोजणीच्या 20 फेर्‍या झाल्या. पहिल्या सहा फेरीअखेर गौतम चाबुकस्वार आघाडीवर होते. मात्र, सातव्या फेरीपासून अण्णा बनसोडे यांनी जादुई आघाडी घेतली. शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी टिकवून ठेवत बनसोडे यांनी गौतम चाबुकस्वार यांचा पराभव केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button