पिंपरीत राष्ट्रवादीकडून “सामना” पेपरची होळी, शिवसेनेवरही केली टिका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/20181027_175530.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेवर केलेल्या टिकेला उत्तर देताना शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे आणि सामना वृत्तपत्राने हीन दर्जाची टिका करून स्वत:च्या असभ्य संस्कृतीचे महाराष्ट्रातील जनतेला दर्शन घडविले आहे, याचा तीव्र निषेध करीत सामना वृत्तपत्राची आज पिंपरीत होळी करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, नेते नाना काटे, प्रशांत शितोळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, अरूण बोऱ्हाडे, फजल शेख, महंम्मद पानसरे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, विजय लोखंडे, आनंदा यादव, वर्षा जगताप, प्रकाश सोमवंशी , गंगा धेंडे, पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, इम्रान शेख, गोरक्ष लोखंडे, शकुंतला भाट, प्रदीप गायकवाड, शशिकांत चौंडीकर, शिला भोंडवे, संजय लंके, शक्रुल्ला पठाण, अमोल भोईटे, रशीद सय्यद, हमीद शेख, निलेश पुजारी, राजेंद्र पवार, यशवंत शिंदे, बाळासाहेब पिल्लेवार, उत्तम हिरवे, संजय औसरमल, सचिन माने, प्रशांत देवकाते, सविता धुमाळ, मिनाक्षी उंबरकर, वर्षा शेडगे, आशा शिंदे, सविता खराडे, वंदना कांबळे, लालमहंम्मद चौधरी, गोरोबा गुजर, स्वप्निल डोळस, सचिन मोरे, अनिल चव्हाण आदींसह आजी-माजी नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.