breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरीत खांबाला रिक्षा धडकून चालक ठार

पिंपरी –  पिंपरीतील डांगे चौक हिंजवडी रस्त्यावर सोमवारी रात्री ११च्या सुमारास अपघात घडला. रस्त्यात असलेल्या विद्युत पथदिव्याच्या खांबाला रिक्षा धडकून झालेल्या या अपघातात एक रिक्षाचालक ठार झाला आहे. सतिश गोविंद पंडागळे (वय ५७) असे या अपघातात ठार झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

पंडागळे हे रात्री डांगे चौकातून घरगुती समान घेऊन येत असताना हिंजवडी रस्त्यावर रस्त्यात मध्येच असलेल्या खांबाचा अंदाज न आल्याने रिक्षाची जोरदार धडक खांबाला बसली. या धडकेत काचेतून पंडागळे बाहेर फेकले गेल्याने त्यांचे डोके खांबावर आदळले तसेच ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्य़ात आले होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला.  डांगे चौक हिंजवडी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असून जागोजागी अर्धवट कामे ठेवण्यात आली आहेत. तसेच अद्यापही जुने विद्युत खांब हटविण्यात न आल्याने हा रस्ता रात्रीचा अतिशय धोकादायक झाला असल्याने येथे वारंवार अपघात होत आहेत. याआधीही गेल्या आठवड्यात याच खांबाला दुचाकीची धडक बसून दुचाकीस्वार ठार झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button