breaking-newsपिंपरी / चिंचवड

पावणे दोन लाख बालकांनी घेतला गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीचा लाभ

पिंपरी ( महा ई न्यूज ) – शहरातील सुमारे एक लाख 61 हजार 475 बालकांनी गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला. या मोहिमेमध्ये सहा लाख 16 हजार 193 बालकांना लस देण्याचे लस देण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, या लसीकरणा दरम्यान दोन बालकांना किरकोळ त्रास झाला होता. त्यांच्यावर तातडीने उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 27 नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहीम शहरामध्ये राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणासाठी महापालिका आणि खासगी शाळा, तसेच अंगणवाडी, बालवाडी आणि नर्सरीमध्ये 6 डिसेंबर 2018 अखेर 448 सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

त्याअंतर्गत शहरातील एक लाख 61 हजार 475 बालकांना या गोवर-रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. या लसीकरण मोहीमेसाठी सर्व वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आरोग्य कर्मचारी, महापालिका व खाजगी शाळेतील शिक्षक, तसेच स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले, असे वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button