breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘पीएमपीएमएल’च्या 73 कर्मचा-यांचे अखेर पालिका सेवेत वर्गीकरण

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) व्यवस्थापनातील 73 कर्मचा-यांना नवीन वर्षात कार्यमुक्त केले आहे. त्या कर्मचा-यांना मंगळवारी (दि. 1) पिंपरी-चिंचवड महापालिकेत रूजू होण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. उर्वरीत 82 कर्मचा-यांना आवश्यकतेनुसार कार्यमुक्त करण्यात येणार असल्याचे ‘पीएमपीएमएल’ व्यवस्थापनाने पालिकेला कळविले आहे.

‘पीएमपीएमएल’ व्यवस्थापनातील 178 कर्मचारी महापालिकेच्या विविध संवर्गातील पदांवर 2000 पासून कार्यरत होते. मात्र, 2017 मध्ये अधिकारी तुकाराम मुंडे ‘पीएमपीएमएल’चे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांनी या कर्मचा-यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश महापालिकेला दिले. त्यावर महापालिकेतील 178 कर्मचा-यांना कार्यमुक्त करून ‘पीएमपीएमएल’कडे वर्ग करण्यात आले. मात्र, मुंडे यांची बदली झाल्यानंतर या कर्मचा-यांची परवड होऊ लागली. त्यावर त्या सर्व कर्मचा-यांनी आम्हाला पुन्हा पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत वर्ग करून घेण्यात यावे, अशी मागणी केली. त्यावर पालिकेतील अनेक सर्वसाधारण सभांमध्ये या विषयावर चर्चेचे गु-हाळ झाले.

178 कर्मचारी पालिका सेवेत रुजू करून घेण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे निर्देश ‘पीएमपीएमएल’ व्यवस्थापनाला दिले. परंतु, या कर्मचा-यांना वर्ग केले जात नव्हते. शेवटी पालिकेकडे मनुष्यबळाची कमतरता भासू लागल्याने यातील काही कर्मचा-यांना पुन्हा रुजू करून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. दरम्यान, 178 कर्मचा-यांमधील काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले. तर, काहींनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. आजरोजी रुजू असलेल्या 155 कर्मचा-यांपैकी 73 कर्मचा-यांना ‘पीएमपीएमएल’ व्यवस्थापनाने 1 जानेवारी रोजी कार्यमुक्त केले आहे. त्यांना पालिका सेवेत रुजू करून घेण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश अद्याप काढले नाहीत. उर्वरीत 82 कर्मचा-यांना आवश्यकतेनुसार कार्यमुक्त केले जाईल, असे ‘पीएमपीएमएल’ व्यवस्थापनाने महापालिका प्रशासनाला कळविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button