breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे रुपीनगरात गडूळ पाणी पुरवठा

  • पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईन एकत्र भूमिगत केल्याचे उघड
  • शिवसेना विभागप्रमुख नितीन बोंडे यांनी आयुक्तांना दिला इशारा

पिंपरी / महाईन्यूज

एकाच चरीमधून ड्रेनेज आणि पाणी पुरवठा लाईन भूमिगत केल्यामुळे प्रभाग 12 रुपीनगर भागातील नागरिकांना गडूळ पाणी पुरवठा होत आहे. यासंदर्भात तक्रार केल्यानंतर अधिका-यांनी याठिकाणी येऊन पाहणी केली मात्र याची दुरूस्ती केली नाही. अधिका-यांच्या नियोजनशून्य कारभाराचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने रुपीनगर भागातील नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडवाव्यात, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना रुपीनगर विभागप्रमुख नितीन बोंडे यांनी दिला आहे.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 रुपीनगरमध्ये असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत. महापालिका अधिका-यांकडे तक्रारी केल्यानंतर देखील त्याची दखल घेतली जात नाही. एवढा उद्दमपणा अधिकारी दाखवत असल्यामुळे नागरिकांची हेळसांड होत आहे. रुपीनगर येथील हुमा बेकरीच्या मागील बाजुवरून नवीन पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाईन भूमिगत केली आहे. या दोन्ही नलिका एकाच चरीमधून भूमिगत केल्यामुळे पिण्याचे पाणी आणि ड्रेनेजचे मैलायुक्त पाणी मिश्रीत होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरातील नळाला दररोज गडूळ पाणी येत आहे. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

गडूळ पाण्याच्या तक्रारी वाडू लागल्यामुळे शिवसेनेच्या वतीने अतिरिक्त कार्यकारी अधिकारी गायकवाड यांच्याकडे समस्या सोडविण्याची मागणी केली होती. त्यांनी जागेवर जाऊन पाहणी देखील केली. याला कित्येक दिवस उलटून गेले मात्र आजतागायत येथील पाणी पुरवठा आणि ड्रेनेज नलिकांचे विभाजन केले नाही. त्यामुळे गडूळ पाण्याच्या समस्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे रुपीनगर भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तक्रार करूनही जर दखल घेतली जात नसेल तर संबंधित अधिका-यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. याची आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दखल घ्यावी. रुपीनगर भागातील नागरिकांची गडूळ पा ण्याची समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा पालिका प्रशासनाच्या विरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नितीन बोंडे यांनी दिला आहे.


उर्मट अधिका-यांचे शिवसेनेच्या निवेदनाकडे दुर्लक्ष

यासंदर्भात शिवसेना संघटिका सुलभा उबाळे आणि भोसरी विधानसभाप्रमुख धनंजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली रुपीनगर शाखेच्या वतीने समस्या सोडविण्यासंदर्भात कार्यकारी अभियंता काळे यांना निवेदन दिले होते. यावेळी विभागप्रमुख नितिन बोंडे, युवासेना विधानसभा चिटणीस अमित शिंदे, शाखाप्रमुख प्रवीण पाटील, सहदेव चव्हाण, रमेश पाटोळे, नामदेव नरळे, उपविधानसभा अधिकारी सुनिल समगिर तसेच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. त्याला महिनाभराचा कालावधी उलटत असताना त्यातील एकही समस्या अधिका-यांना सोडविता आली नाही. अतिरिक्त कार्यकारी अधिकारी गायकवाड यांच्याकडे यासंदर्भात पाठपुरावा करून देखील त्यांनी दखल घेतली नाही. गायकवाड यांच्या ढिसाळ नियोजनामुळे रुपीनगर भागातील समस्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. त्यांच्या निष्क्रिय कामकाजामुळे आज प्रभागातील नागरिकांना गडूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. याचा शिवसेनेच्या वतीने तिव्र निषेध करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button