Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
पार्थ पवार यांचा वि’जय’ सुकर करण्यासाठी… जय पवार आता मैदानात!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Jay.jpg)
पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज पिंपरी-चिंचवड परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या. पिंपरी चिंचवड शहरात प्रचार करत असताना रात्री पार्थ पवार यांचे लहान बंधू जय पवार हे देखील प्रचारासाठी सामील झाले.
पार्थ पवार यांचा मावळ मतदारसंघात प्रचाराचा झंझावात सुरू आहे. अस असताना अनेक स्थानिक नेते या प्रचार दौऱ्यात सामील होत आहेत. तर दुसरीकडे पार्थ पवार यांची आई सुनेत्रा पवार, वडील अजित पवार हे देखील विविध ठिकाणी प्रचारात सामील होताना दिसत होते. मात्र आज पिंपरी-चिंचवड शहरात पार्थ पवार यांचा प्रचार दौरा सुरू असताना जय पवार यांनी देखील हजेरी लावली.