breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे आमने-सामने, दोघांनीही केले हस्तांदोलन आणि स्मितहास्य

  • दोघांनीही एकमेकांकडे पाहत केले स्मित हास्य
  • दोघांच्या भेटीनंतर कार्यकर्ते दोघांकडे पाहात राहिले

पिंपरी ( महा-ई-न्यूज ) –  मावळ लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करुन बाहेर पडताना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयासमोर अचानक भेट झाली. यावेळी स्वताः पार्थ पवार यांनी समोरुन आलेल्या खासदार बारणे यांना हस्तांदोलन करीत त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य केले. दोन्ही तुल्यबळ उमेदवार आमने-सामने आल्यानंतर महाआघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. यावेळी अनेकांनी हा क्षण आपल्या कॅमे-यात कैद केला.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक कार्यालयात आज ( मंगळवारी) विनायक चतुर्थीचा मुहूर्त साधून महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर ते निवडून कार्यालयातून बाहेत जात होते. त्याचवेळी  महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे हे पदाधिका-यासह अर्ज भरण्यासाठी कार्यालयात येत होते. त्यावेळी पार्थ पवार यांनी बारणे यांच्याकडे जाऊन हस्तांदोलन केले.

दरम्यान, महायुतीचे आणि महाआघाडीत तुल्यबळ दोन्हीही उमेदवार आमने-सामने आल्यानंतर दोन्हीही पक्षाकडील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी करीत दोघांना गराडा टाकला. तसेच काहींनी लगेल हा क्षण मोबाईलच्या कॅमे-यात कैद करुन फोटो व व्हिडिआे व्हायरल केले.

यावेळी खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार बाळा भेगडे, नगरसेवक संदीप वाघेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button