breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

पाणी पुरवठा विभागातील ‘सांडणीस्वार’ अधिका-याला आयुक्तांचे अभय

  • उपमहापौरांच्या 15 प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ
  • सह शहर अभियंता तांबे यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शहारात होण्या-या गडूळ पाणी पुरवठ्याबाबत उपमहापौरांनी विचारलेल्या 15 प्रश्नांची उत्तरे दोन दिवसांत दोतो म्हणणारे पाणी पुरवठा विभागातील सह शहर अभियंता रामदास तांबे यांच्याकडे चार दिवस उलटले तरी प्रश्नांची उत्तरे नाहीत. केवळ तांत्रिक माहितीच्या आधारे नगरसेवकांना ‘अंगारा’ लावणारे अधिकारी तांबे यांची किती नाचक्की झाली तरी त्यांना शहानपन येत नसल्याचे दुर्दैव आहे. अशा ‘सांडणीस्वार’ अधिका-यांवर आयुक्त कारवाई का करत नाहीत, असा यक्ष प्रश्न पिंपरी-चिंचवडकरांच्या पुढ्यात उपस्थित झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागांमध्ये आजही गडूळ पाणी पुरवठा होत आहे. यापूर्वी यासंबंधीत तक्रारी केल्यानंतर पाणी गडूळ नसून त्यामध्ये क्लोरिनचे प्रमाण आढळून आल्याचे उत्तर पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता तांबे यांनी नगरसेवकांना दिले. वास्तविकता, गडूळ पाण्यामुळे शहरात मलेरिया, डायरिया, जुलाब, उलट्या अशा आजाराची साथ पसरली. अनेकांना आजही रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावे लागतात. कोरोनाच्या आपात्कालीन परिस्थितीत तांबे यांनी शहराला गडूळ पाणी पाजून नागरिकांच्या जिव्हाशी खेळ केला. त्यामुळेच उपमहापौर तुषार हिंगे यांनी पाणी पुरवठ्यासंदर्भात मंगळवारी (22) गटनेत्यांची बैठक बोलावून तांबे यांना 15 प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नाहीत, माहिती घेण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी देण्यात यावा, अशी पळवाट तांबे यांनी शोधली होती. त्यावर उपमहापौर हिंगे यांनी भरल्या बैठकीत तांबे यांच्या भूमिकेचा तिव्र निषेध करून सभागृहाचा त्याग केला होता.

याला दोन नव्हे तर चार दिवस उलटले तरी तांबे यांनी उपमहापौरांच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. उत्तरे शोधण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देखील तांबे यांना कमी पडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुळात तांबे यांनी पाणी पुरवठ्यासंदर्भात ठोस उत्तरे कधी दिलीच नाहीत. नगरसेवकांना केवळ गोलगोल फिरवून उल्लू बनविण्याचे काम तांबे यांनी आजपर्यंत केले आहे. तरीही, नुसत्या बैठकांवर बैठका घेण्याचा नगरसेवक सपाटा लावत असतात. बैठकीचे फलीत काय ? याचा कोणीही विचार करत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे उपमहापौरांनी भर बैठकीत तांबे यांना त्यांची जागा दाखवून दिली. पिंपरी-चिंचवडकरांच्या जिवाशी खेळ खेळणा-या तांबे यांना आयुक्तांकडून का अभय दिले जाते, हा खरा प्रश्न असल्याचे नगरसेवक बोलत आहेत.

उपमहापौर तुषार हिंगे यांनी विचारलेल्या 15 पश्नांची उत्तरे अद्याप रामदास तांबे यांनी दिलेली नाही. मंगळवारी (दि. 22) पार पडलेल्या बैठकीत उत्तरांसाठी त्यांनी दोन दिवसांची मुदत मागितली होती. आज चार दिवस झाले तरी तांबे यांनी उत्तरे दिली नाहीत. त्यांच्याकडे उत्तरांसाठी पाठपुरावा सुरू ठेवणार आहे.

महापौर उषा उर्फ माई ढोरे, पिंपरी-चंचवड महापालिका

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button