breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाणी पुरवठा विभागाचा सहशहर अभियंता उत्तरे देण्यात फेल !

  • पदाधिका-यांनी भर बैठकीत ओढले ताशेरे
  • हा अधिकारी तात्काळ बदलण्याची केली मागणी

पिंपरी | महाईन्यूज

पिंपरी-चिंचवडमधील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेतील त्रुटींबाबत उपमहापौर तुषार हिंगे यांनी पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांना प्रश्न विचारले होते. तब्बल पंधरा दिवस उलटून गेल्यानंतर तांबेंनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. मात्र, एकाही प्रश्नाचे उत्तर समाधानकारक दिले नसल्यामुळे उपमहापौर तुषार हिंगे यांनी आयुक्तांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. तांबे यांच्या जागी पाठबंधारे विभागातील अधिका-याची नियुक्ती करून त्यांच्याकडे कामकाज सोपवावे, अशी मागणी पदाधिका-यांनी केली.

पाणी पुरवठ्यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या पदाधिका-यांची आज बैठक झाली. या बैठकीत पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता तांबे यांनी उपमहापौर हिंगे यांनी पंधरा दिवसांपूर्वी विचारलेल्या प्रश्नांची बोटचेपी उत्तरे दिली. या उत्तराबाबत आपण समाधानी नसल्याची नाराजी हिंगे यांनी व्यक्त केली. त्यामुळे तांबे यांची पुन्हा एकदा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमोर नाचक्की झाली. या बैठकीला महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर राहूल जाधव, नगरसेविका उषा मुंडे, नगरसेवक हर्षल ढोरे आदी यावेळी उपस्थित होते.

सध्याचा पाणी पुरवठा कमी असल्यामुळे दररोज पाणी पुरवठा करण्यासंदर्भात प्रशासनाच्या भूमिकेबाबत पदाधिका-यांनी विचारना केली. दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी 30 एमएलडी पाण्याची उपलब्धी आवश्यक आहे. हे पाणी जोपर्यंत उपलब्ध होत नाही, तोपर्यंत सुरळीत पाणी पुरवठा शक्य नसल्याचे उत्तर पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांनी दिले. भामा आसखेड धरणातून पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही अधिका-यांनी सांगितले. नागरिकांना शुध्द पाणी पुरवठा का होत नाही, अशीही पदाधिका-यांनी विचारना केली. शुध्दीकरण प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. त्यावर आपली शुध्दीकरण प्रक्रिया पुणे मनपापेक्षा दर्जेदार असल्याचे उत्तर तांबे यांनी दिले. याची शहानिशा करणार असल्याचे उपमहापौर हिंगे यांनी सांगितले.

या भागात पाणी पुरवठ्याच्या असंख्य तक्रारी

पाणी पुरवठा विभागाशी संबंधीत कामांचे कंत्राट एकाच ठेकेदाराला दिली जात असल्यामुळे तांबे यांच्यावर पुन्हा पदाधिका-यांनी निशाना साधला. वॉलमन, टॅंकर चालन, वितरण व्यवस्था, पंपींग, सफाई कामाचे कंत्राट एकाच ठेकेदाराला दिले जाते. त्याच्याकडून दर्जेदार काम होत नसल्याची तक्रारही पदाधिका-यांनी व्यक्त केली. त्यावर चक्रपाणी वसाहत, सुदर्शननगर, बिजलीनगर, प्रेमलोक पार्क आदी भागात पाणी कमी दाबाने येत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. या तक्रारी का सोडविल्या जात नाहीत, असा प्रश्नही आयुक्तांनी उपस्थित केला. त्यावर अधिका-यांनी हो.. करतो… पाहतो… अशी नेहमीच्या स्टाईलने उत्तरे देऊन पदाधिका-यांची नाराजी ओढवून घेतली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button