breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ उत्तम पर्याय

  • राष्ट्रवादी कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांच्याकडून आयुक्तांना निवेदन
  • जनजागृतीसाठी प्रभागनिहाय माहिती शिबिरे घेण्याची केली मागणी

पिंपरी, (महाईन्यूज) – पावसाचे पाणी वाया न घालवता ते जमीनित जिरवल्यास किंवा ते पाणी साठवूण पुनर्वापर केल्यास अधिक फायद्याचे ठरेल, ही भावना मनाशी बाळगून संपूर्ण शहरात प्रभागनिहाय रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्पाची माहिती देण्यासाठी स्वतंत्र शिबीर भरविण्यात यावे, अशी मागणी वाकड येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी केली आहे.

यासंदर्भात कस्पटे यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या, कमी होत चाललेली वृक्ष लागवड तसेच वाढत असलेले सिमेंटचे जंगल, या कारणांमुळे पर्जन्यवृष्टीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्याचा परिणाम भूजल पातळी खालावण्यावर होत आहे. भविष्यात पुरेसे पाणी उपलव्ध न झाल्यास नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याची साठवण ( Rainwater Harvesting) करून पुनर्वापरासाठी पाणी जमा करण्याची योजना आमलात आणण्याची गरज आहे. पावसाच्या पाण्याची साठवण (Rainwater Harvesting) या योजनेबद्दल लोकांना माहिती नसल्याकारणास्तव ब-याच प्रमाणात दरवर्षी पावसाच्या पाण्याची नासाडी होत आहे. ही योजना राबवल्यास पावसाच्या पाण्याची नासाडी टाळता येवू शकते. सुजान नागरिक म्हणून पिंपरी-चिंचवडच्या लोकांना पावसाच्या पाण्याची साठवण ( Rainwater Harvesting ) या योजनेची माहिती होण्याकरीता एक माहिती शिबीर आयोजित करण्यात यावे. त्याचे फायदे लोकांना कळाल्यास हा प्रकल्प आमलात आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास कस्पटे यांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button