breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना धरण आमच्या उशाला, पण आमची घागर रिकामी रे…

पिंपरी |महाईन्यूज| प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणात मुबलक पाणी साठा आहे. पण सत्ताधारी भाजप आणि निष्क्रीय-नियोजनशून्य आयुक्तांच्या कारभारामुळे कृत्रिम पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे धरण आमच्या उशाला अन्ं आमची घागर रिकामी रे… म्हणण्याची वेळ आमच्यावर आली आहे. त्यामुळे आज अ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणीही के.के.कांबळे युवा मंचच्या वतीने करण्यात आली.

यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. योगिता कांबळे, मीनाक्षी भालेराव, स्नेहल कुलकर्णी, पंकज दळवी, मंचचे अध्यक्ष के. के. कांबळे आदीसह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. या वेळी अ क्षेत्रीय कार्यालयाचे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता दीपक कुंभार, कनिष्ठ अभियंता संदीप वैद्य यांना निवेदन देण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहरात पाणी कपातीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याचा शहरातील महिलांना त्रास होत आहे. महापालिकेच्या या निर्णयाच्या निषेधार्थ के. के. कांबळे युवा मंचच्या वतीने पाण्याचा माठ घेऊन आंदोलन केले. अ क्षेत्रीय कार्यालयाच्या संबंधीत अधिकार्‍यांना घेराव घालत महिलांनी निषेध व्यक्‍त केला.

आकुर्डी येथील रामनगर, दत्‍तनगर येथे पाण्याची समस्या नित्याचीच झाली आहे. या परिसरात कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत आहे. पुर्वी दररोज पाणी पुरवठा केला जात असला तरी या भागातील नागरिकांना कमी दाबामुळे पुरेसे पाणी उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. त्या बाबत वारंवार निवेदने देऊनही दखल घेण्यात आली नाही. सध्या पाणी कपातीचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने घेतला आहे. अगोदरच कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत असताना पाणी कपातीचा निर्णय  समस्यांमध्ये अधिकच वाढ करणारा आहे. त्याचा निषेध या वेळी करण्यात आला. तसेच रामनगर, दत्‍तनगरमध्ये पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करा, अशी मागणी या वेळी के. के. कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली.

यावेळी कमी पाणी अ क्षेत्रीय कार्यालयाचे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता दीपक कुंभार, कनिष्ठ अभियंता संदीप वैद्य म्हणाले की, पाणी कपातीचा निर्णय संबंधीत विभागातील अधिकार्‍यांचा आहे. त्यामुळे काही काळ ही समस्या निर्माण होणार आहे. मात्र ज्या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे, तिथे अधिक दाबाने पाणी पुरवठा केला जाईल, असे आश्‍वासन या वेळी संबंधीत अधिकार्‍यांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button