breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

पवना धरणात 87.95 टक्के पाणीसाठा, 24 तासात 2.2 टक्क्यांनी वाढ

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणात 87.95 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला 100 टक्के धरण भरले होते. मात्र, यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे धरण भरायला विलंब होत आहे.

पवना धरण परिक्षेत्रात गेल्या 24 तासामध्ये 19 मिलीमीटर पाऊस पडला. 1 जूनपासून आतापर्यंत 1 हजार 389 मिलीमीटर पाऊस झाला. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 3 हजार 116 मिलीमीटर पाऊस झाला होता. तर, गेल्या वर्षी आजच्या तारखेला 100 टक्के धरण भरले होते. यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे पावसाची कमी नोंद झाली आहे. तथापि, पवना धरण परिक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने आतापर्यंत पवना धरणात 87.95 टक्के पाणी साठले आहे. गेल्या 24 तासामध्ये पाणीसाठ्यात 2.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button