breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘पर्यटनविहाराला जाने पडले महागात’, घरातील पावनेपाच लाखांचे दागिने लंपास

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
घरातील सदस्य पर्यटन विहारासाठी केरळ याठिकाणी गेले असता चोरट्याने घराचा कडीकोयंडा उचकटून घरातील रोख रकमेसह 4 लाख 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. हा प्रकार सोमवारी (दि. 2) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुनावळे येथील बुध्दविहारासमोरील ओव्हाळ वस्तीत घर नंबर 270 याठिकाणी उघडकीस आला.

याप्रकरणी अश्वराज अरुण ओव्हाळ (वय 30, रा. घर नंबर 270, मेन रोड, ओव्हाळ वस्ती, बुध्दविहारासमोर, पुनावळे, ता. मुळशी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्वराज ओव्हाळ हे कुटुंबियांसह पर्यटन विहारासाठी केरळ येथे गेले होते. 24 नोव्हेंबर रोजी ते पुनावळेतून मार्गस्त झाले होते. रविवारी (दि. 1) पर्यटनविहाराचा आनंद लुटून ते घरी परतले. त्यावेळी घराचा कडीकोयंडा उचकटून दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घरात पाहणी केली असता 177 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 10 हजार रुपये रोख लंपास केल्याचे निदर्शनास आले. दागिन्यांची किंमत बाजारभावानुसार 4 लाख 65 हजार रुपये एवढी आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button