breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते संतोष सौंदणकर यांच्या कार्य अहवालाचे थाटात प्रकाशन

पिंपरी / महाईन्यूज

शिवसेना उपनेते, पुणे जिल्हा संपर्कमंत्री तथा परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर यांच्या कार्य अहवालाचे थाटात प्रकाशन करण्यात आले.

पुणे येथील नेहरू मेमोरियल हॉल याठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनपर बैठकीच्या प्रसंगी शिवसेना उपनेते महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री पुणे जिल्हा संपर्कमंत्री अनिलजी परब उपस्थित होते. यावेळी शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हे, पश्चिम महाराष्ट्र उपनेते समन्वयक रवींद्र मिर्लेकर, उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, उपनेते रघुनाथ कुचिक, संपर्कप्रमुख सुनील कदम, सत्यवान उभे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे,  संपर्क संघटिका शालिनी देशपांडे, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, ज्ञानेश्वर कटके, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, राजेंद्र काळे, पुणे शहर प्रमुख संजय मोरे, पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख योगेश बाबर आदी उपस्थित होते. 

विद्युत सनियंत्रण समितीचे पुणे जिल्हा सदस्य म्हणून काम करत असताना गेल्या चार वर्षात आलेल्या लोकाभिमूख कार्याचा अनुभव संतोष सौंदणकर यांनी अहवालात समावेश केला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून विद्युत प्रशासनाशी समन्वय साधून नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर सौंदणकर यांनी भर दिला आहे. त्यांच्या यशस्वी कामाचे कथन या कार्य अहवालात करण्यात आले आहे. सौंदणकर यांनी प्रसिध्द केलेल्या या अहवालाचे आणि त्यांच्या कार्याचे मंत्री अनिल परब यांनी कौतुक केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button