breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पदवीप्रदान सोहळ्यात ‘पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी’ देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – ‘पुणेरी पगडी ऐवजी, फुले पगडी देऊन नवीन पदवी धारकांना पदवीप्रदान सोहळ्यात गौरवण्यात यावे, अशी मागणी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी निवेदनाद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर यांच्या कडे केली आहे.

यासंदर्भात बनसोडे यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रशासनाने पदवीप्रदान सोहळ्याच्या पोषाखामध्ये नुकतेच बदल केला आहे. पुर्वीच्या गाऊन व कॅप पोषाखाऐवजी आता कुर्ता, पायजमा व पुणेरी पगडी असा पोषाख केला आहे. याविरोधात युवक काँग्रेसने तात्काळ आग्रही मागणी केली आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यास अधिक सन्मान देऊन, त्यांचे समतावादी विचार अधिक खोलवर प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आपल्या भारतीय व जगाभरातून येऊन पुण्यात शिक्षण घेणा-या विद्यार्थी वर्गामध्ये रूजावेत. यासाठी पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी देऊन नवीन पदवी धारकांना पदवीप्रदान सोहळ्यात गौरवण्यात यावे, अशी मागणी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी निवेदनाद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर यांच्याकडे केली आहे.

पुणे विद्यापीठास सावित्रीबाई फुलेंचे नाव देण्यात आले. त्यांनी अपार कष्ट व मेहनत घेऊन पुण्यातच मुलींची पहिली शाळा सुरु केली.  त्यांच्या या कार्यात त्यांचे पती व महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचे योगदान फार मोठे आहे. आपण त्यांच्या कार्यांची प्रेरणा, स्फूर्ती व विचारधारा नवीन पदवी धारण करणा-या युवा वर्गांमध्ये व्हावी, यासाठी पुणेरी पगडी एवजी फुले पगडी देऊन विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करावे, असे बनसोडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button