breaking-newsपिंपरी / चिंचवड

पंतप्रधान व गृहमंत्री जनतेशी खोटे बोलतात, काँग्रेसचे डॉ. रत्नाकर महाजन यांची टिका

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शामा प्रसाद मुखर्जी जनसंघाचे अध्यक्ष होण्याअगोदर पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमलीग बरोबर सरकारमध्ये सहभागी होते. 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात संघाच्या वतीने सहभागी होण्यास हेडगेवारांनी आक्षेप घेतला होता, अशी विचारधारा असणा-या पक्षाचे पंतप्रधान व गृहमंत्री जनतेशी अनेकदा खोटे बोलतात. गृहमंत्र्यांच्या मताविरुध्द पंतप्रधान खोटे बोलतात. अशी टिका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केली.

कॉंग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (दि. 28) डॉ. महाजन यांच्या हस्ते प्राधिकरण आकुर्डी येथील कार्यक्रमात झेंडावंदन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, तुकाराम भोंडवे, ज्येष्ठ नेत्या बिंदू तिवारी, निगार बारसकर, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, शाम अगरवाल, लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगूटमल, हरी नायर, सुरेश लिंगायत, मयूर जयस्वाल, मकर यादव, चंद्रशेखर जाधव, बाळासाहेब साळुंखे, बाबा बनसोडे, हिरामण खवळे, मेहताब इनामदार, दिलीप पांढारकर, तानाजी काटे, गुंगा क्षिरसागर, भास्कर नारखेडे, बाजीराव आल्हाट, ना.सी. हर्डीकर, निर्मल तिवारी, शुभांगी निकम, अक्षय शेरकर, अविनाश कांबळे, बेंजामिन डिसोजा, समाधान सोरटे, विश्वनाथ खंडाळे, दिपक जाधव, सचिन नेटके, बी. आर. वाघमारे, एन.पी.रवी, वसिम शेख, विठ्ठल कलसे, पांडूरंग जगताप, शफी चौधरी, विष्णू खरे आदी उपस्थित होते.

डॉ. महाजन म्हणाले की, एनआरसी फक्त आसाम राज्यापुरते मर्यादित होते. हिंदू वोट बँकेचा फायदा घेण्याचा भाजप प्रयत्न करीत आहे. आसाममध्ये 19 लाख घुसखोर निघाले. त्यात 16 लाख हिंदू होते. भाजपच्या मागील पाच वर्षांच्या कार्यकालापेक्षा कॉंग्रेसच्या काळात जास्त घुसखोर शोधून त्यांना परत त्यांच्या देशात पाठविण्यात आले. हि आकडेवारी भाजपनेच संसदेत सादर केली आहे. एनपीआर – एनसीआर (राष्ट्रीय जनगणना आणि नागरिकत्व सुधारणा) यांचा काही संबंध नाही, असे गृहमंत्री शहा पुन्हा खोटे बोलतात. अर्थ मंत्र्यांवर टिका करताना डॉ. महाजन म्हणाले सत्तर वर्षात एकही अर्थमंत्री असा झाला नाही की, पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या पश्नांना उत्तरे देताना हाताखालच्या अधिका-यांना त्यांना विचारावे लागते, हि खेदाची बाब आहे.

सचिन साठे म्हणाले की, देशाच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक विकासामध्ये कॉंग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. सामाजिक सलोखा ठेवून सर्व जाती धर्मांना, समाजातील सर्व वर्गाला बरोबर घेऊन जाणारा कॉंग्रेस पक्ष आहे. मात्र, आताचे केंद्रात असणारे सरकार आपली निष्क्रियता झाकण्यासाठी देशाला अस्थिरतेकडे व अराजकतेकडे घेऊन जात आहे. हे रोखण्यासाठी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन देशाचा व कॉंग्रेसचा इतिहास नागरिकांना सांगावा असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले व उपस्थितांना कॉंग्रेसच्या वर्धापनदिनाच्या आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

स्वागत सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, सुत्रसंचालन मयुर जयस्वाल आणि आभार विशाल कसबे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button