Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
न्यू सिटी प्राइड स्कूलच्या विद्यार्थ्यांची शहीद जवानांना श्रद्धांजली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/dd-1.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या ४४ भारतीय जवानांना पिंपळेसौदगार येथील न्यू सिटी प्राइड स्कूलमधील चिमुकल्यांनी मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहिली.
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे गुरूवारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी न्यू सिटी प्राइड स्कूलमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील चिमुकल्यांनी मेणबत्ती पेटवून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, शाळेचे संस्थापक अरूण चाबुकस्वार, संजय कुटे, राकेश भास्कर, बाळासाहेब कुटे, भगवान गोडांबे, दत्तात्रय कुटे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते. नगरसेविका निर्मला कुटे यांनी शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे सांगितले.