breaking-newsपिंपरी / चिंचवड

न्यू सिटि प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतीक कार्यक्रम

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटि प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात सजारा करण्यात आला. नगरसेविका निर्मला कुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने विविध संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी स्वराज नागरिक पतसंस्थे अध्यक्ष सुनील कुंजीर, सामाजिक कार्यकर्ते आर. डी. भालेराव, अनिता तुतारे, भगवान गोडांबे, निवृत्त पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, आबा पांढरे, संतोष कापसे, इंद्रजीत काटे, राजेश गायकवाड, तात्या शिनगारे, स्वप्नील भालेराव, शर्वरी जमालकर, बाळासाहेब शेडगे, युवराज प्रगणे, संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, संदीप चाबूकस्वार, मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाभिश आदी उपस्थित होते.

यावेळी शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यानी देशभक्तीपर गीत गायन केले. संस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमांची शोभा वाढवली. विद्यार्थ्यानी कराटे प्रात्यक्षिके सादर केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परिश्रम घेऊन संविधान लिहिले. त्यामुळेच जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वश्रेष्ठ संविधान आपल्या देशात आहे. भारतीय संविधानामुळेच देश अखंड व अभेद्य आहे, असे उद्गार संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार यांनी काढले. ध्वजावंदनानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

स्वरूपा पौड आणि साक्षी वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. आस्था महातो हिने  आभार व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button