breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नेहरुनगरला एमएनजीएल गॅस गळती, अग्निशामक दल दाखल

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नेहरुनगर परिसरात ड्रेनेज लाईनची कामे करण्यात येत आहेत. त्या कामासाठी खोदाई करताना एमएनजीएल कंपनी पाईपची लीक होवून गळती सुरु झाली. त्यानंतर अग्नीशामक विभागाच्या खबरदारीमुळे गळती रोखण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

पिंपरी चिंचवड शहरभर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीचा विस्तार करण्यात आलेला आहे. शहरातील अनेक भागात ग्राहक जोडल्याने सर्वत्र गॅसचा पुरवठा करणा-या पाईपलाईन टाकण्यात आलेल्या आहेत.

महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात ड्रेनेजचे काम सुरु आहे. नेहरुनगर परिसरात ड्रेनेज लाईनची जेसीबीद्वारे खोदाई सुरु असताना महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीच्या पाईपलाईन फुटून गॅस गळती सुरु झाली. त्यावेळी पालिकेच्या अग्नीशामक विभागाला पाचारण करुन पाण्याचा फवारा करण्यात आला. तसेच कंपनीच्या संबंधित सुरक्षा अधिकारी व कर्मचा-यांना संपर्क साधून तात्काळ बोलविण्यात आले. त्यांनी गॅस गळती झालेल्या पाईपचा जॅमर बसवून गॅस गळती तात्काळ थांबविण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

त्यावेळी काहीकाळ नेहरुनगर ते भोसरी वाहतूक देखील थांबवून इतरत्र मार्गे वळविण्यात आली होती. तसेच सध्यस्थितीत गॅस गळतीचा धोका टळला असून सदरील फुटलेली पाईप देखील बदलण्याचे वेगात काम सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button