breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात बाळाला मिळाले नवजीवन; पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र पिंपरी येथे निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या चासकमान मधील दोन महिन्याच्या बाळावर यशस्वी उपचार.

निसर्ग चक्रीवादळ या वादळामुळे कोकणासह पुणे जिल्ह्यालाही मोठी झळ बसली आहे यात अनेक कुटुंबांचे ही मोठं नुकसान झाले आहे यात चासकमान येथे एक दुर्दैवी घटना घडली वादळापासून सुरक्षित राहण्यासाठी एक कुटुंब आपल्या घराचे दारे-खिडक्या बंद करून वादळ जाण्याची वाट पाहत होतं पत्र्याच्या साहाय्याने घराला आधार देणाऱ्या लोखंडी रॉडला कापडी झोळी बांधून दोन महिन्याच्या बाळाला झोपवले होते प्रचंड पाऊस व सोसाट्याचा वारा मोठ्या वेगाने वाहत होता या वाऱ्यामुळे घराचे छतासह लोखंडी रॉड उचकटला व वाऱ्याबरोबर उडून गेला सोबतच झोळीत असणारे बाळ ही सुमारे वीस फूट उंचावर फेकले गेले व प्रचंड वेगाने जमिनीवर आदळले. छत व लोखंडी रॉड बाळाच्या बाजूला पडल्यामुळे ते थोडक्यात बचावले परंतु परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे तात्काळ या बाळाला मंचर येथील रुग्णालयातून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात पाठविण्यात आले या रुग्णालयातील बालरोग विभागाने त्वरित उपचार सुरू केले.

डॉ डी वाय पाटील रुग्णालयातील बाल मेंदुरोग तज्ञ् डॉ विश्वनाथ कुलकर्णी यांनी बाळाचे निदान केले बाळाला उलटी होते होती व हलके झटके येत असल्याने एक्स-रे व एम आर आय तसेच इतर तपासण्याद्वारे असे दिसून आले की बाळाची कवटी फ्रॅक्चर झाली असून मेंदूला हादरा बसल्याने त्याला इजा झाली आहे मात्र शरीरातील इतर अवयवांना कुठे इजा व दुखापत नव्हती. कवटी फ्रॅक्चर व मेंदूतील इजा झाल्यामुळे बाळाला डॉ मनोज कुमार पाटील व सहकारी यांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते तेथे पाच दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते बाळाने या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. या चिंताजनक स्थितीतून बाळास बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले. बाळाच्या पुन्हा सर्व तपासण्या केल्या असून आरोग्याबाबत कोणतेही दोष आढळले नाही हे बाळ सुखरूप आहे. त्याला सामान्य वार्ड मध्ये हलवले असून लवकरच डिस्चार्ज करण्यात येईल. ही दुर्दैवी घटना कुटुंबांच्या डोळ्यादेखत घडल्याने या बाळाचे संपूर्ण परिवार आई-वडील आजी आजोबा हे धास्तावलेल्या व घाबरलेल्या स्थिती असून त्यांचे समुपदेशन करून त्यांना मानसिक आधार दिला. बाळावरील सर्व उपचार हे अत्यल्प दारात करण्यात आले अशी माहिती बालरोग विभागाच्या युनिट प्रमुख डॉ. शैलजा माने यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या मंचर येथील डॉ. कैलास धायबर यांनी वेळेच प्रथमोपचार केल्याने आम्हाला पुढील उपचार करण्यास यश मिळाले.

या बाळावरील सर्व उपचार डॉ. सौ. माने यांच्या युनिटच्या देखरेखीखाली करण्यात आले असून बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. शरद अगरखेडकर तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस भवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्रीताई पाटील, विश्वस्त डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव, ट्रस्टी व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांनी या दोन महिन्याच्या बाळावर केलेल्या यशस्वी उपचाराबद्दल यात सहभागी सर्व डॉक्टर, परिचारिका इतर कर्मचारी वर्गाचे कौतुक केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button