निगडी सेक्टर 22 मधील नागरिकांच्या घरात घुसले पाणी ; रहिवाशांचे भक्ती शक्ती चाैकात आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/IMG-20180716-WA0279-1.jpg)
निगडी – सलग दोन दिवस पडणा-या संततधार पावसाने निगडीच्या सेक्टर 22 मधील विविध परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी भक्ती-शक्ती चौकात येऊन मुंबई-पुणे महामार्गावर आंदोलन केले. त्यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. 24 तास होऊनही पावसाची संततधार सुरुच आहे. निगडी, ओटास्कीम येथील मौलाना आझाद नगर आणि सम्राटनगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. एका अनधिकृत थाटलेल्या टपरीमुळे पावसाचे पाणी वाहून जात नव्हते. साचून राहिले होते. त्यामुळे ते पाणी घरांमध्ये शिरले होते. यामुळे नागरिकांचे चे जनजीवन विस्कळीत झाले होते. संतप्त झालेल्या नागरिकांनी भक्ती-शक्ती चौकात येऊन मुंबई-पुणे महामार्गावर आंदोलन केले. त्यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.
महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिका-यांनी जेसीबीच्या सहाय्याने ही टपरी हटविली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जावू लागले आहे. दरम्यान, चिखली, घरकुलमध्येही काही ठिकाणी घरामध्ये पाणी शिरले असून पालिकेचे अधिकारी पाईपच्या सहाय्याने घरातील पाणी बाहेर काढत आहेत.