breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडी प्राधिकरणातील कचरा दोन दिवसांत उचला, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन

  • अ क्षेत्रीय अधिकार यांना दिले निवेदन
  • नगरसेवक अमित गावडे यांनी दिला इशारा

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग 15 निगडी प्राधिकरणातील कचरा नियमित उचलला जात नाही. अंतर्गत रस्त्यांची साफसफाई वेळेवर केली जात नाही. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे प्राधिकरणात ठिकठिकाणी कच-याचे ढिग साचले आहेत. येत्या दोन दिवसांत आरोग्यविषयक समस्या मार्गी लावाव्यात. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक अमित गावडे यांनी दिला आहे.

यासंदर्भात गावडे यांनी अ क्षेत्रीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, निगडी प्राधिकरणाला आरोग्यविषयक समस्यांनी घेरले आहे. अ क्षेत्रीय कर्मचा-यांच्या दुर्गक्षपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अंतर्गत रस्ते वेळेवर साफ केले जात नाहीत. कचरा नियमितपणे उचलला जात नाही. कचरा उचलणा-या गाड्या नियमित येत नाहीत. गाड्या येण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे नागरिकांना कच-याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

परिसरात कच-याचे ढिग साचले आहेत. वरून धो-धो पाऊस पडत असताना कचरा ओला होऊन परिसरात घाण दुर्गंधी पसरत आहे. या घाणीमुळे डेंग्यू, मलेरिया असे साथिचे अजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐन पावसाळ्यात कच-याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. क्षेत्रीय अधिका-यांकडे तक्रार करूनही प्रश्न मार्गी लागत नाहीत. येत्या दोन दिवसांत कच-याची समस्या सोडविण्यात यावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावडे यांनी दिला आहे.

नगरसेवक अमित गावडे, शिवसेना उपशहरप्रमुख अमोल निकम, विधानसभा संघटिका सरिता साने, विधानसभा समन्वयक भाविक देशमुख, विभागप्रमुख शैला निकम, बाळासाहेब वाल्हेकर, शाखाप्रमुख शरद जगदाळे, विभागप्रमुख कामिनी मित्रा यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button