पिंपरी / चिंचवड
निगडीतील सखी मंचची बांधिलकी; चिंबळीतील बालकाश्रमात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/membership-tree-1000.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – निगडी येथील श्रावणी सखी मंचच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. याचाच भाग म्हणून यावर्षी देखील सखी मंचने चिंबळी येथील बालकाश्रमात कपडे आणि खाऊ वाटप केले.
यावेळी स्मिता खेडेकर यांनी बालकाश्रमातील मुलांना ध्यान धारणा आणि गुरुपूजेचे महत्व सांगितले. वाढत्या थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी उबदार कपडे वाटण्यात आले. श्रावणी सखी मंच वर्षभर डोहाळे, बारसे, भजने अशा उपक्रमातून मिळणारे मानधन समाजातील गरजू संस्थाना देण्यात येते. यावेळी ज्योती गायचौरे यांनी आश्रमास दोन हजार रुपयांची मदत दिली.
उपक्रमासाठी अध्यक्षा अनिता शर्मा, शांता शेरकर यांनी परिश्रम घेतले.