breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्या जागरूकतेमुळे फुकट धान्य वाटपाला खीळ – सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाच्या या संकटकाळात हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना दानशूर लोकांकडून केल्या जाणाऱ्या मोफत धान्य वाटपाला विरोधी पक्षनेते नाना काटे आणि शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांच्या जागरूकतेमुळे खीळ बसल्याचे सत्तारूढ पक्षनेने नामदेव ढाके यांनी सांगितले.

यासंदर्भात नामदेव ढाके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “कोरोनाला थोपविण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. नागरिक गेल्या महिनाभरापासून घरातच राहून कोरोनाशी लढा देत आहेत. मात्र या लढाईत हातावर पोट असणारे मजूर, कंपन्यांमधील कामगार, महिनाभर काम केल्यानंतर आलेल्या पगारातून आपल्या कुटंबाला जगविणारे अल्प उत्पन्नधारक नागरिकांना मोठी झळ सोसावी लागत आहे. आपल्या कुटुंबाचे पोट कसे भरायचे हा मोठा प्रश्न या नागरिकांसमोर आहे. अशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवडमधील अनेकजण स्वतःहून पुढे येत गरजू आणि वंचित नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करत आहेत. त्यात विविध राजकीय पक्षांसोबत शहरातील दानशूर लोकांचाही समावेश आहे.

हे सर्वजण शहरातील गोरगरीब नागरिकांना मोफत धान्य वाटप करत आहेत. तसेच या नागरिकांना इतर ठिकाणांहून धान्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रेशनिंग दुकानातून मिळणारे धान्य घेण्यासाठी सुद्धा अनेक नागरिकांकडे पैसे नाहीत. त्यामुळे काही जणांनी समाजातील श्रीमंतांना विनंती करून त्यांच्या मदतीने गोरगरीबांच्या रेशनचे पैसे भरण्याची व्यवस्था केली. मात्र विरोधी पक्षनेते नाना काटे आणि शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांच्या जागरूकतेमुळे आता या गोरगरीबांना केल्या जाणाऱ्या धान्य वाटपाला खीळ बसली आहे.

नाना काटे आणि राहुल कलाटे या दोघांनीही प्रशासनाकडे वारंवार तक्रार केल्याने तसेच प्रसारमाध्यमांमध्ये वारंवार बातम्या छापून आणल्यामुळे धान्य वाटपात राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका, असा फतवा निघाला आहे. या दोघांनीही दाखविलेल्या जागरूकपणामुळे सध्याच्या बिकट सामाजिक परिस्थितीत गोरगरीबांना मिळणाऱ्या धान्य वाटपात खीळ बसली असल्याचे त्यांनी सांगितले.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button