नागरिकांना सक्षम सेवा, सुविधा द्या; महापारांच्या अधिका-यांना सूचना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/2-copy.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शहरातील विकास कामे तातडीने मार्गी लावावीत. नागरिकांना सक्षम सेवा व सुविधा देण्यात याव्यात, अशा सुचना महापौर राहुल जाधव यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तळवडे, चिखली, मोशी, च-होली व डुडूळगाव येथील विविध चालू असलेल्या विकास कामांची पाहणी महापौरांनी केली. त्यावेळी त्यांनी या सुचना दिल्या. त्यावेळी महापौर यांच्या समवेत महिला बाल कल्याण समितीच्या सभापती स्वीनल म्हेत्रे, नगरसदस्या साधना मळेकर, अश्विनी जाधव, नगरसदस्य लक्ष्मण सस्ते, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, आण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, उपअभियंता महेश बरिदे, जे. डी. जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी तळवडे येथील स्मशानभूमिमध्ये सिमाभिंत बांधणे, वृक्षारोपण, पाण्याची टाकी, लाईटची व्यवस्था, स्मशानभूमिसाठी शेड, पोहोच रस्ता, रंगरंगोटी, स्वच्छता गृहाची व्यवस्था, लँडस्केपींग, सुसज्ज पार्कींग इत्यादी सुविधा तातडीने देण्याबाबत महापौर यांनी अधिका-यांना सुचना दिल्या. तसेच, पूर्ण शहरातील स्मशानभूमि व दशक्रीया घाटांची पाहणी येत्या आठ दिवसांमध्ये करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.