breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांना आधार कार्डवर राशन मिळण्याची व्यवस्था करा, दत्ताकाकांचे अजित पवारांना साकडे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड परिसरात सर्व सामान्य गोरगारिब हातावर पोट असणारी कष्टकरी, मजुरकाम करणारी व कंत्राटी कामागार व बिगारी काम करणारी लोकांना आधार कार्ड पाहून राशन द्यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात साने यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचचडमध्ये इतर राज्याचे लोक मोठ्या प्रमाणात रहातात. त्यांची खुप गैरसोसय झाली आहे, जर आपल्या अन्नधान्यची सोय होत नसेल तर आपण दोन दिवसाचा वेळ देऊन लोकांना आपापल्या ठिकाणी जाण्याची परवानगी दयावी. आम्ही आमच्या परीने जवळपास माझा प्रभाग व शेजारील प्रभागात ७ हजार किलो तांदुळ ५ हजार किलो गहु व २००० किलो डाळ व तेल मिठ मिरची पावडर दिले आहे.

आज पुणे शहर बंद झाले आहे. त्यामुळे आम्हाला सुध्दा अन्नधान्य वाटण्यास अडचण येत आहे. आमच्याकडे वाटण्यासाठी व खरेदी करण्यासाठी सुध्दा अडचण आहे. म्हणुन आपण शासनाच्या वतीने आधार कार्ड धारकांना अन्नधान्य द्यावे, अशी मागणी साने यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button