breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांच्या सेवेसाठी आमदार जगतापांची ‘हक्काची हेल्पलाईन’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

भाजप सरकारने डिजिटल इंडिया योजनेखाली शासकीय तसेच निमशासकीय कामकाज बहुतांश प्रमाणात ऑनलाईन पध्दतीने कार्यान्वीत केले आहे. त्याचाच प्रेरित भाग म्हणून चिंचवड विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या महापालिका तसेच शासन स्तरावरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वतीने “हेल्पलाईन” सुरू केली आहे.

या हेल्पलाईनचे नाव ‘आपली हेल्पलाईन’ असे आहे. त्याचा क्रमांक 7507411111 हा आहे. “जे जगात नवं… ते चिंचवडला हवं…” अशी टॅगलाईन देऊन हेल्पलाईनचा सोशल मीडियावर प्रचार, प्रसार केला जात आहे. या हेल्पलाईनवर नागरिकांनी महापालिकेशी संबंधीत अथवा राज्य शासनाशी संबंधीत तक्रार अथवा समस्येची माहिती पाठवायची आहे. ते व्हॉट्सअपद्वारे पाठविता येईल. त्याची स्वतः दखल घेऊन आमदार जगताप समस्यांचे निराकरण करतील.

अधिक माहितीसाठी पिंपळे गुरव येथील आमदार जगताप यांच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button