breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकत्व संशोधन कायद्यावर माजी मंत्री विनोद तावडे यांचा पिंपरीत मार्गदर्शन मेळावा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने ‘नागरिकत्व संशोधन कायदा (CAA)’ यासंदर्भात जनजागृती व्हावी, समाजातील भ्रम दूर व्हावेत, याकरिता माजी मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत गुरुवार (दि. 16) दुपारी अडीच वाजता पिंपरी कॅंम्पातील बी. टी. अडवाणी धर्मशाळेत मेळावा घेण्यात येणार आहे.

पिंपरीतील गुरूद्वारा, बौद्धविहार आदी सामाजिक मंदिरांनाही ते भेटी देणार आहेत. यावेळी विनोद तावडे यांसोबत भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, राज्यसभेचे खासदार अमर साबळे, महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button