चापेकर बंधु हे आजच्या पिढीचे ‘आयकॉन’ असायला पाहिजेत – मारुतीबाबा कु-हेकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/PHOTO-1-2.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
भारतासारख्या बहुभाषिक खंडप्राय देशातील कोट्यावधी जनता ज्या तिरंगी झेंड्याला अभिमानाने सलाम करते. त्या तिरंगी झेंड्याचा प्रेरणादायी स्वातंत्र्याचा इतिहास नव्या पिढीला सांगितला पाहिजे. या इतिहासातूनच त्यांना स्वातंत्र्याचे महत्व कळेल. स्वातंत्र्यासाठी हजारो नागरीकांनी आपल्या जीवनाची आहुती दिली. शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, हुतात्मा दाभाडे, चाफेकर बंधू हे आजच्या पिढीचे ‘आयकॉन’ असले पाहिजेत, असे मार्गदर्शन मारुतीबाबा कु-हेकर महाराज यांनी केले.
प्रजासत्ताकदिनानिमित्त विश्व मैत्री संघाच्या वतीने शांतीब्रम्ह मारुतीबाबा कु-हेकर यांना ‘राष्ट्र गौरव पुरस्कार 2020’ प्रदान करण्यात आला. आर्चाय अत्रे सभागृह, संत तुकाराम नगर पिंपरी येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी सैनिक पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब एम.के. पाटील, राष्ट्रीय खेळाडू प्रगती गायकवाड, एनडीआरएफचे अधिकारी सच्चिदानंद गावडे, हवाईदलाचे सेवानिवृत्त अधिकारी बिरेंद्र सिंग, उद्योजक प्रेमचंद मित्तल, शहिद पत्नी विद्या सुभाष सानप, उल्हास केंजळे, प्रविणकुमार गुप्ता यांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी महापौर माई ढोरे, माजी आमदार शरद ढमाले, विश्व मैत्री संघाचे अध्यक्ष व संयोजक लालबाबू गुप्ता, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक सचिन चिखले, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, प्रविणकुमार गुप्ता, आद्यप्रसाद चतुर्वेदी, वकील प्रसाद गुप्ता, सागर भोसले, अशोक कांबळे, सुभाष माछरे, उषा घारे, रामदास पाटील, राहुल भालेकर, शामकांत सातपुते, विश्राम कुलकर्णी, अब्दुल सय्यद खान, नसीम अब्दुल खान, सुनिल सिंह, गिरिश कारकर, पप्पू गुप्ता, उमेश सिंह, राजेश बडगुजर, अनिल लखन आदी उपस्थित होते.
माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब एम. के. पाटील म्हणाले की, ग्रामिण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर करावा, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतक-यांच्या उत्पन्नात व शासकीय महसूलात वाढ झाली होती.
कार्यक्रमाच्या संयोजनात अक्रम शेख, दिपक चव्हाण, डॉ. पंकज गुप्ता, इम्तियाज शेख, विकास गुप्ता, विवेक भूजबळ, पृथ्वीराज चव्हाण, आदित्य कुमार, सुरज गुप्ता, विक्रम मिना, प्रकाश कांबळे, रोहित गुप्ता, विनोद गुप्ता, विनोद गायकवाड आदींनी सहभाग घेतला होता.
प्रास्ताविक व स्वागत लालबाबू गुप्ता यांनी केले. सुत्रंसचालन अक्षय मोरे यांनी केले. तर, आभार अशोक साठे यांनी मानले.