breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नव्या कोरोनाचे पिंपरी चिंचवडमध्ये आढळले 3 रुग्ण

पुणे |महाईन्यूज|

नवा कोरोना आता महाराष्ट्रात हातपाय पसरताना दिसत आहे. नव्या कोरोनाच्या (corona news strain) रुग्णांची संख्या आता आणखी वाढली आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही धोका वाढला आहे. नव्या कोरोनाचे आणखी 3 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन असलेल्या कोरोना रुग्णांची पुण्यातील संख्या 4 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रातील नव्या कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे. आज पुण्यात तीन रुग्ण आढळले आहेत. हे तिन्ही रुग्ण पिंपरी-चिंचवडमधील आहेत. याआधी राज्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग झाल्याचे 8 रुग्ण सापडले होते. त्यात मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे.

इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील २६८ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी ७ प्रवाशांचे नमुने NIV पुणे येथे UK स्ट्रेन करीता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविले असता ०३ अहवाल नकारात्मक आढळले. त्यातील ०३ अहवाल UK स्ट्रेन B.१.१.७ करीता सकारात्मक असून तिघांची प्रकृती चांगली असून १ अहवाल प्रलंबित आहेत. नव्या कोरोना रुग्णांचे पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर भोसरी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचा धोका आणखी वाढला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button